Belagavi

गौंडवाडमधील महिलांना वाहनात कोंबून आणले; पोलिसांच्या कृतीवर सर्व स्तरातून टीका

Share

गौंडवाडमध्ये गटांत झालेल्या संघर्षानंतर गावातील महिलांना पोलिसांनी वाहनातून कोंबून आणल्याच्या कृतीचा सध्या तीव्र निषेध करण्यात येत आहे

होय, गौंडवाड येथे शनिवारी रात्री घडलेल्या खून व त्यानंतर हिंसक संघर्षानंतर घरात झोपलेल्या निष्पाप मुलांना पोलिसांनी गुन्हेगार ठरवत रातोरात उचलून नेले. त्यावर मुलांना अटक करण्यास त्यांच्या मतांनी तीव्र विरोध केला. मुलांच्या सुटकेसाठी गावातील महिलांनी धरणे धरली. डोळ्यात अश्रू आणून मुलांना सोडण्याची विनवणी या महिलांनी पोलिसांना केली. मात्र पोलीस त्याला बधले नाहीत.

दरम्यान, आपली मुले कोठे आहेत या काळजीने गौंडवाडच्या महिलांनी बेळगावातील केएलई इस्पितळाकडे धाव घेतली. त्यावेळी महिला पोलिसांनी त्या महिलांना पोलीस वाहनात कोंबून गावात सोडले. पोलिसांची ही  कृती आता टीकेचा विषय बनली आहे.

 

Tags: