Belagavi

बसवराज होरट्टी आठव्यांदा विधान परिषदेवर; संपूर्ण देशात विक्रम

Share

माजी सभापती आणि भाजपचे उमेदवार बसवराज होरट्टी आठव्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेतसंपूर्ण देशातच हा विक्रम करणारे ते एकमेव राजकारणी ठरले आहेत. विजयानंतर होरट्टी यांनी आपल्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत मतदारांचे आभार मानले.

देशात आजपर्यंत ८ वेळा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मान कोणाच्या नावावर नाही. सर्वाधिक ४ वेळा निवडून येण्याचा मान माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातही एका नेत्याच्या नावावर असा विक्रम आहे. गेल्या ७ वेळा जेडीएसच्या उमेदवारीवर निवडून आलेले बसवराज होरट्टी आता  आठव्या वेळेला भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत.

विजयाची घोषणा होताच बसवराज होरट्टी यांनी प्रसारमाध्यमांना हर्षोल्हासात प्रतिक्रिया दिली. हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शिक्षकांचे ऋण मी कसे फेडणार या प्रश्नावर त्यांनी, मी आतापर्यंत शिक्षकांचे ऋण फेडतच आलो आहे. वरचा देव खाली आला तरी शिक्षण खात्यात सुधारणा करू शकणार नाही. समस्या येतच राहतात, त्या सोडवतच राहू. शिक्षकांचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या समस्या त्या-त्या वेळी सोडविल्यानेच शिक्षकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे असे त्यांनी सांगितले.

Tags: