बेळगावातील फोर्ट रोडवर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर टांगणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी हमारा देश संघटनेने केली आहे. यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानकारक विधान केल्याचा आरोप करून त्यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर लटकावल्याची घटना बेळगावातील फोर्ट रोडवर उघडकीस आली होती. या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निषेध केला होता. या कृतीतून बेळगावातील शांतता बिघडविण्यात येत असल्याचा आरोप करून हमारा देश संघटनेने यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निदर्शने करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
यासंदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी मल्लिकार्जुन यांनी, कोणत्या तरी विधानावरून नुपूर शर्मा यांची प्रतिकृती बेळगावात लटकवण्यात आली होती. यातून बेळगावातील शांतता बिघडविण्यात येत आहे. त्यामुळे या उपद्रवी लोकांवर कारवाईची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एकंदर नुपूर शर्मा यांची प्रतिकृती टांगल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बेळगावात उमटत आहेत. आता हमारा देश संघटनेनेही यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पहावे लागेल.


Recent Comments