Vijayapura

बेंदूर पौर्णिमेनिमित्त विजापुरात शास्त्री मार्केट फुलले !

Share

बेंदूर आणि वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी विजापुरात लालबहादूर शास्त्री मार्केट आज गर्दीने फुलल्याचे दृश्य पहायला मिळाले.

बेंदूर पौर्णिमेनिमित्त विजापूर परिसरातील आणि दूरवरच्या गावातील शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना सजविण्यासाठी अलंकारिक वस्तूंच्या खरेदीसाठी या मार्केटमध्ये आले होते. यानिमित्ताने लालबहादूर शास्त्री मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली.

कोरोनाची भीती पुन्हा पसरली असूनही शेतकऱ्यांनी हौसेने खरेदीसाठी आज विजापुरात गर्दी केली. बेंदूर सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठीच्या अलंकारिक वस्तूंसोबतच फुले, फळे व अन्य साहित्य ग्राहक खरेदी करताना दिसून आले. फ्लो

 

Tags: