बेळगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रविवारी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४४ या तिथीनुसार आज, रविवारी बेळगावात छत्रपती शिवाजी उद्यानात तिथीनुसार छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने साजरा करण्यात आला.

प्रेरणा मंत्र पठणाने या कार्यक्रमाची सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे शिरीष गोगटे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

यावेळी शिरीष गोगटे आणि ह. भ. प. बाळू भक्तीकर महाराज यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दीपक पवार यांनी ध्वजपूजा केली. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार पालखीत छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि शिवचरित्र ग्रंथ ठेवून देवदर्शन यात्रा काढण्यात आली.

ध्वजपथक, अश्वपथक, लेझीम आणि पारंपरिक वाद्यपथकांच्या सहभागाने ही यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवकालीन युद्धकौशल्याचे प्रदर्शन घडविणाऱ्या कलांचे सादरीकरण करण्यात आले.


Recent Comments