राजरोसपणे गांजा विकणाऱ्या दोघांच्या विजापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शहरातील कामत हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली.

विजापुरात हरणशिकारी कॉलनीतील रहिवासी ४२ वर्षीय मोहन यल्लाप्पा चव्हाण आणि नवबाग करडी येथील रहिवासी ३४ वर्षीय अब्दुलहमीद सिराजसाब मुधोळ याना विजापूर पोलिसांनी गांजा विकताना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. शहरातील कामत हॉटेल परिसरात ते गांजा विकताना आढळून आले. त्यांच्याकडून ३ किलो २७५ ग्रॅम वाळलेला गांजा आणि १३९० रुपये रोख रक्कम असा एकूण ६५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोलघुमट पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फ्लो


Recent Comments