Belagavi

शर्मा, जिंदाल यांच्या अटकेसाठी एसडीपीआयची निदर्शने

Share

प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आजएसडीपीआयच्या वतीने निदर्शने करण्यात आली

प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल याना अटक करावी अशी मागणी एसडीपीआयने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ‘इन न्यूज’शीबोलताना निदर्शकांनी सांगितले की, कोणत्या प्रसंगी काय बोलावे याची जाण नसलेल्या व्यक्तीला भाजपने प्रवक्ता बनवले आहे. त्यांच्या वक्तव्याने अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही याचा दुष्परिणाम होत आहे.

त्यामुळे देशातील गोरगरीब संकटात सापडतील. याला भाजपची असली पिलावळच कारणीभूत ठरेल असा संताप व्यक्त केला. बाईट एकंदर भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबरांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. यावरून पुढे काय घडते हे पहावे लागेल.

Tags: