महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विजापूरमध्ये अक्कमहादेवी महिला विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आपल्या पायावर उभं करण्यासाठी विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. आता पुन्हा एकदा पत्रकारिता विभागात एक नवा प्रयोग आखण्यात आला असून याविषयी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
व्हॉइस : विजापूरमधील अक्कमहादेवी विद्यापीठात सध्या नवा प्रयोग करण्यात येत आहे. विद्यार्थिनींना ड्रोन ट्रेनिंग देण्यात येत आहे. पत्रकारिता विभागातून हे ड्रोन ट्रेनिंग देण्यात येत असून ड्रोनच्या माध्यमातून दृश्ये कशी घेण्यात येतात? ऑपरेटिंग कसे करावे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. याविषयी या विभागाचे ओंकार काकडे हे प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणात २१ विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. ()
हे प्रशिक्षण आठवडाभर चालणार असून, एकावेळी ३ ते ४ विद्यार्थिनींना एकत्रित घेऊन हे प्रशिक्षण देण्यात येत आहे..ड्रोनच्या साहाय्याने फुटेज कॅप्चर करणे हि सोपी गोष्ट नाही. यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. प्रशिक्षण घेतलेले विशेषज्ञच ड्रोन ऑपरेट करू शकतात. यासाठी विद्यार्थिनींना ड्रोन कॅमेऱ्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे ओंकार काकडे यांनी सांगितले.
पत्रकारिता विभागात अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थीनींसाठी प्रसारमाध्यमांमध्ये काम केल्याचा अनुभव यावा यासाठी तसे वातावरण तयार करण्यात आले आहे. वर्गात शिकविताना प्रसारमाध्यमात काम केल्याचा अनुभव यावा अशा पद्धतीने कोन्स्पेट डिझाईन करण्यात आल्याचे ओंकार काकडे म्हणाले. ()
नव्या जमान्याचा नव्या तंत्रज्ञानावर आधारित असे शिक्षण राज्यातील एकमेव महिला विद्यापीठात देण्यात येत असून या माध्यमातून विद्यार्थिनींच्या ज्ञानात आणखी भर पडेल, अशी खात्री आहे.


Recent Comments