Belagavi

dc nitesh patil visit suvarnsoudh : सुवर्णसौधला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली भेट

Share

सुवर्णविधानसौध परिसराची सर्वांगीण सुरक्षा, स्वच्छता आणि सर्वांगीण देखभालीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सुवर्णसौध ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सुवर्णसौध देखभालीसाठी कार्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच कर्मचाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. सुवर्णसौध समोर शेवया वाळत घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने यासंदर्भात संबंधित महिलेवर कारवाई करण्यात यावी, पुढील काळात या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. स्वच्छतेसह दैनंदिन देखभालीसाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि कामाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सुरक्षेसंदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेत सुवर्णसौध येथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करावी, ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येईल, अशी सूचना द्यावी, कोणत्याही प्रकारची कामे करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा. कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संजीवकुमार हुलकाई यांनी सुवर्णसौध देखभालीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती दिली. यावेळी सहायक कार्यकारी अभियंते भीमा नायक, पोलीस अधिकारी आणि इतर उपस्थित होते.

Tags: