विजापूर जिल्ह्यातील नागठाणचे जेडीएस आमदार देवानंद चव्हाण यांच्या कार्यामुळे भारावून गेलेल्या एका कार्यकर्त्याने आ. चव्हाण यांचे टॅटू छायाचित्र गोंदवून घेत आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

होय, आता सगळीकडेच टॅटू काढण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. चित्रविचित्र टॅटू गोंदवून घेऊन एन्जॉय करणारे अनेकजण आहेत. काही लोक त्यांचे आवडते अभिनेते आणि राजकीय नेत्यांची छबी गोंदवून घेतात. त्याचप्रकारे, विजापूर जिल्ह्यातील जेडीएसचे आमदार देवानंद चव्हाण यांच्या छबीचा टॅटू एका तरुणाने हातावर गोंदवला आहे. विजापूर येथील रहिवासी शिवू कोळी असे या तरुणाचे नाव आहे.
आमदार चव्हाण यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा दाखविण्यासाठी मी आमदार देवानंद यांचे पोर्ट्रेट बनवले आहे. पुढील वेळीही तेच नागठाणचे आमदार म्हणून निवडून यावेत अशी इच्छा शिवूने व्यक्त केली आहे.


Recent Comments