बेळगावातील शहापूर खडेबाजारमधील प्रसिद्ध हनुमान मंदिर ट्रस्ट कमिटीने गेल्या ४ वर्षांपासून बंद ठेवले आहे. त्यामुळे संतापलेल्या भाविकांनी शनिवारी रास्ता रोको निदर्शने करून दरवाजाचा कुलूप दगडाने तोडून मंदिर दर्शनासाठी खुले केले.
शहापूरातील खडेबाजारातील ऐतिहासिक हनुमान मंदिर ट्रस्ट कमिटीने गेल्या ४ वर्षांपासून बंद ठेवल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. शनिवारीसुद्धा मारुतीरायाचे दर्शन घेता येत नसल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
मंदिर खुले करण्याची अनेकवेळा मागणी करूनही ट्रस्ट कमिटीने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी शनिवारी खडेबाजारात भर रस्त्यात ठाण मांडून रास्ता रोको केला. ज्या कोणा ट्रस्टीकडे चावी आहे त्यांनी ती आणून द्यावी, आम्ही मंदिरात पूजा अर्चा करू असे भाविकांनी सांगितले. परंतु कोणीही ट्रस्टी न आल्याने अखेर संतप्त भाविकांनी दगडाने मंदिराच्या दरवाजाचा कुलूप तोडून मंदिर सर्वाना दर्शनासाठी खुले केले.


Recent Comments