झारखंडचे राजधानी रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावची कन्या लक्ष्मी संजय पाटील हिने कांस्य पदक मिळवून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
हल्याळ येथील क्रीडाशाळेत शिकणाऱ्या बेळगावच्या लक्ष्मी संजय पाटील हिने २६ ते २९ मे दरम्यान, रांची, झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १५ वर्षांखालील ५४ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवून जिल्ह्याचे आणि शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.
विजेत्या कुस्तीपटू लक्ष्मीचे या यशाबद्दल उत्तर कन्नड जिल्हा पंचायत, जिल्हा प्रशासन आणि सहायक संचालक युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याने अभिनंदन केले आहे. लक्ष्मी पाटीलने यापूर्वीही अनेक कुस्ती स्पर्धात पुरस्कार मिळवले आहेत. तिच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments