Belagavi

‘आरएलएस’मध्ये लिंग समानतेवर जागृती कार्यक्रम

Share

बेळगावातील आरएलएस महाविद्यालयात विध्यार्थ्यांसाठीलिंग समानताया विषयावर एक दिवसीय जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

होय, बेळगावातील आरएलएस महाविद्यालयात विध्यार्थ्यांसाठी ‘लिंग समानता’ या विषयावर एक दिवसीय जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला सबलीकरण विभागातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापूरच्या ‘अभिमान’ या संघटनेचे संस्थापक विशाल पिंजानी यांनी यावेळी लिंग समानता या विषयावर मार्गदर्शन केले.

समाजात प्रत्येकजण माणूसच असतो. पण लैंगिक इच्छा, आवडीनिवडी हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. त्या जैविक असत नाहीत. एलजीबीटीक्यू समूहाच्या व्यक्तींबाबत समाजात अनेक पूर्वग्रह आहेत. ते दूर करण्याची गरज आहे असे सांगून याबद्दल स्वतःला समाजात आलेले अनुभव, अवमान, आव्हाने त्यांनी कथन केली. एलजीबीटीक्यू समूहाच्या व्यक्तींना समाजाकडून इतरांप्रमाणेच सन्मान मिळण्यासाठी प्रत्येकाला कसे योगदान देता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर अध्यक्षस्थानी होत्या. महिला सबलीकरण विभागाच्या संयोजिका एम. एम. पुराणिक, पी. बी. डुबाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.

 

Tags: