1 जून रोजी हुतात्मादिनी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासह मराठीतून परिपत्रकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

हुतात्मादिन व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी काल सोमवारी मराठा मंदिर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते.
1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता मराठी भाषिकांना मराठी भाषेतून परिपत्रके द्यावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.भावी काळात विभागवार बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बेळगावात तालुक्यात मराठी भाषिक नेत्यांमध्ये एकी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. युवापिढी समितीच्यामागे खंबीरपणे उभी असून हा लढा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्नाचा लढा हा सीमाभागातील मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा लढा आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत आपण सर्वानी एकसंघ होऊन लढत राहणे आवश्यक आहे. मराठीतून सरकारी परिपत्रके आणि उतारे, दाखले मिळणे हा आमचा हक्क आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किणेकर यांनी केले. बाईट
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिप सदस्य सरस्वती पाटील, मनोज पावशे, एस. एल. चौगुले यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments