आज नव्हे तर १८व्या वर्षांपासून जेंव्हा मिसरूड फुटलं तेंव्हापासून मिशी राखतोय, असे सांगत माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी मंत्री उमेश कत्ती यांच्यावर पलटवार केला.
हुक्केरी पदासाठी निवडणूक लढवत आहेत या भाजप नेत्यांच्या आरोपाला प्रकाश हुक्केरी यांनी आज बेळगावात प्रत्युत्तर दिले. १-२ वेळा नव्हे तर ७ वेळा निवडून आलो आहे. ५ वेळा आमदार, एकदा खासदार आणि एकदा पदवीधरांसाठी विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आहे. या वेळी निवडून आलो तर शिक्षकांसाठी काम करेन असे त्यांनी सांगितले.
‘मिशीवर ताव मारून मते मिळत नाहीत’ या उमेश कत्ती यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रकाश हुक्केरी पत्रकारांना म्हणाले, याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, आताच नव्हे तर यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी मला टार्गेट केले आहे असे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही दिसल्यावर उमेश कत्तीना भीती वाटते का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर, ते तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे, पण मिशी मी काही आज सोडलेली नाही, १८व्या वर्षांपासून जेंव्हा मिसरूड फुटलं तेंव्हापासून मिशी सोडतोय, असे प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले. एकंदर ‘मिशीवर ताव मारून मते मिळत नाहीत’ या उमेश कत्ती यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी मंत्री उमेश कत्ती यांच्यावर पलटवार केलाय.


Recent Comments