गोव्यातील म्हापसा येथील पेडेम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या गोवा राष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत बेळगावातील शोटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर आणि बोडकेनहट्टी येथील शाखेच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करून पदकांची लयलूट केली आहे.

पहिली गोवा राष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा गोव्यातील म्हापसा येथील पेडेम स्टेडियमवर नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बेळगावातील शोटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर आणि बोडकेनहट्टी येथील शाखेच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. विजयनगर शाखेच्या कराटेपटूंमध्ये १८ वर्षांखालील गटात श्रीशैल चंद्रकांत कुंडेकर याने कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत कांस्यपदक मिळवले.
१७ वर्षाखालील गटात ज्ञानेश्वर चिक्के याने कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत कांस्य पदक, १४ वर्षाखालील गटात प्रेमजीत भिलवडे आणि प्रीती देसाई यांनी कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत रौप्यपदक, १३ वर्षाखालील गटात श्रेयस चंद्रकांत कुंडेकर आणि नेहल पाटील यांनी कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत रौप्यपदक, ११ वर्षाखालील गटात वैभवी मोरजकर हिने कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत रौप्यपदक, १० वर्षाखालील गटात श्रवण भोसले आणि श्रेयश कडोलकर यांनी कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत रौप्यपदक, ८ वर्षाखालील गटात धन्वी मोरजकर हिने कटा प्रकारात सुवर्ण व कुमिटेत रौप्यपदक मिळवले.
कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशनच्या बोडकेनहट्टी येथील शाखेच्या कराटेपटूंमध्ये १७ वर्षाखालील गटात धनराज पाटील याने कटा प्रकारात कांस्य व कुमिटेत रौप्यपदक मिळवले. १६ वर्षाखालील गटात शेखर बसर्गे याने कटा प्रकारात रौप्य व कुमिटेत कांस्य पदक, संकेत तवनोजी याने कटा व कुमिटे या दोन्ही प्रकारात प्रत्येकी १ सुवर्णपदक मिळवले. १२ वर्षाखालील गटात जितेश तवनोजी यानेही कटा व कुमिटे या दोन्ही प्रकारात प्रत्येकी १ सुवर्णपदक मिळवले.
या सर्व कराटेपटूंचा स्पर्धेनंतर पेडेम स्टेडियमवर पदके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील (चलवेनहट्टी) यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार आयोजकांनी केला. त्याचप्रमाणे ब्लॅक बेल्ट विजेते श्रेयस कुंडेकर आणि प्रीती देसाई यांचा स्मृतिचिन्ह देऊन खास सत्कार करण्यात आला. पदकविजेत्या कराटेपटूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Recent Comments