बेळगाव तालुक्यातील बसवणं कुडची गावात विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी बसवणकुडची ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बसवणकुडची गावात रस्ते, गटारी यासह विविध सुविधांचा अभाव आहे. बसवणं कुडची तसेच मनपा व्याप्तीत येणाऱ्या परिसराचा विकास झाला नाही. या भागात सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यासंदर्भात बोलताना प्रभाग क्रमांक ४८ मधील रहिवाशांनी सांगितले, बसवणकुडची येथील समस्यांसंदर्भात अनेकवेळा पालिका अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अजूनही आपल्या गावात गटारी आणि रस्त्यांचा विकास झाला नाही. गटारीचे पाणी जाण्यास जागा नाही. दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरण्याचेही प्रकार होत असून या समस्येकडे तातडीने लक्ष पुरविण्यात यावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून ग्रामस्थांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


Recent Comments