विजापूरमधील क्रीडापटूंसाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. यानुसारच सिंथेटिक ट्रॅकचीही निर्मिती हाती घेण्यात आली होती. मात्र हे कामकाजदेखील इतर कामकाजाप्रमाणेच ठप्प झाले होते. यासंदर्भातील वृत्त इन न्यूज नेटवर्कने प्रसारित केले आणि लागलीच स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत ठप्प असलेले कामकाज पुन्हा एकदा सुरु झाले आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहुयात….

विजापूरमधील जिल्हा क्रीडांगणावर निर्मिती होत असलेल्या सिंथेटिक ट्रॅक चे कामकाज अर्धवट स्थितीत ठप्प झाले होते. यासंदर्भातील वृत्त इन न्यूज नेटवर्कने प्रसारित केले होते. युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सिंथेट्रीक ट्रॅक बद्दलचे वृत्त निदर्शनास आले आणि लागलीच या सिंथेटिक ट्रॅक च्या कामकाजाची पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. या सिंथेटिक ट्रॅक वर दिवसभर क्रीडापटू सराव करताना दिसतात. ५ कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात येत असलेले हे सिंथेटिक ट्रॅक क्रीडापटूंच्या अत्यंत फायद्याचे आहे. 
विजापूरमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय पातळीवर उच्च कामगिरी करणारे क्रीडापती आहेत. या क्रीडापटूंनसाठी ५ कोटी रुपयांच्या खर्चातून ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक निर्माण होत होते. या ट्रॅक वर जनताही मॉर्निंग वॉक साठी येताना दिसायची., यामुळेही क्रीडापटूंच्या सरावात व्यत्यय निर्माण होत होता. मात्र आता हे सिंथेटिक ट्रॅक क्रीडापटूंसाठी संपूर्णपणे खुले होणार असून यामुळे क्रीडापटूंमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
विजापूरमधील ठप्प झालेल्या सिंथेटिक ट्रॅक कामकाजाला इन् न्यूज नेटवर्क वर प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन सुरुवात करण्यात आली आहे. विजापूरमध्ये अनेक पद्धतीचे क्रीडाप्रकार खेळून उच्च कामगिरी करणारे क्रीडापटू आहेत. जिल्हा क्रीडांगणावर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या सदर कामकाजामुळे क्रीडापटू आनंद व्यक्त करत आहेत.
आपली मराठीसाठी , विजयकुमार सारवाड, इन न्यूज नेटवर्क, विजापूर


Recent Comments