Belagavi

मधुमेहग्रस्त मुलांसाठी उन्हाळी सुटी शिबीर

Share

 बेळगावातील केएलई प्रभाकर कोरे इस्पितळात मधुमेहग्रस्त मुलांसाठी उन्हाळी सुटी शिबीर नुकतेच घेण्यात आले. या शिबिरात १६०हुन अधिक मुलांनी भाग घेतला.

मधुमेहग्रस्त मुले आणि त्यांच्या मातांसाठी बेळगावातील केएलई प्रभाकर कोरे इस्पितळात उन्हाळी सुटी शिबीर १४ मे रोजी घेण्यात आले. या शिबिरात १६०हुन अधिक मुलांनी भाग घेतला. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी बोलताना खा. मंगल अंगडी यांनी, मधुमेहग्रस्त मुलांच्या समस्या सोडविण्याची तसेच त्यांना जीवनातील आव्हानांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

अशा मुलांना योग्य आहार आणि तणावमुक्त जीवनशैली उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालकांवर आहे असे सांगून डॉ. एम. बी. जाली यांच्या नेतृत्वाखालील केएलई डायबेटिक सेंटरने राबविलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. केएलई इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. बी. जाली, काहेरचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी,

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महंतशेट्टी, बाल मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुजाता जाली, ज्येष्ठ पत्रकार मनीषा सुभेदार, डॉ. संजया कंबार, डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. तन्मय मेटगुड डॉ. दीपश्री, डॉ. ज्योती निर्वाणी आदी उपस्थित होते. मधुमेही मुले कृष्णा यडुरे, पवित्रा कारगी यांनी साखर नियंत्रणात ठेवल्याबद्दल तसेच उत्कृष्ट माता म्हणून यमुना कोरीगिरी यांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

 

 

 

Tags: