भारतीय बौद्ध महासभा बेळगाव शाखेच्या वतीने आज भगवान बुद्ध यांची जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात आली.

बेळगावातील बौद्ध विहारात आज, सोमवारी भगवान बुद्ध यांची जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी 9 वाजता बुद्ध विहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, मानवंदना देण्यात आली. तसेच ध्वजारोहण करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध यांची पूजा करून बुद्ध वंदना म्हणण्यात आली. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना
प्रा. के. डी. मंत्रेशी यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. भारतासह जगातील अनेक देशांत आज अनेक समस्या, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती उदभवली आहे. या सगळ्यांवर मार्ग केवळ बुद्धांच्या शिकवणुकीतूनच मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, त्याची पार्श्वभूमी आणि बाबासाहेबांचे बौद्ध धर्माविषयीचे विचार यांची सविस्तर माहिती दिली.
संध्याकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून शांतीरथ फेरी काढण्यात आली.
यानंतर बुद्ध विहार मध्ये सामूहिक त्रिसरण सूत पठण ,जेष्ठ विचारवंतांकडून मार्गदर्शन व बुद्ध, भीम गीतांचा कार्यक्रम तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष यल्लाप्पा कांबळे, पी. वाय. गडीनायक, शेखर शिंगे, प्रा के डी मंत्रेशी, मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, जीवन कुरणे सहित भारतीय बौद्ध महासभा बेळगाव शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments