बेळगावमधील चार गरीब आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी बेळगावमधील विद्या आधार शिक्षण आणि ग्रामविकास सोसायटीने पुढाकार घेतला आहे.

सोमवारी बेळगावमधील भरतेश कॉमर्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाऊराव काकतकर महाविद्यालयातील यश खोत या विद्यार्थ्याला १० हजार रुपये, वनिता विद्यालय इंग्रजी माध्यमातील ख़ुशी विजय मोहिते आणि प्रेम विजय मोहिते यांना प्रत्येकी ५ हजार रुपये, भाऊराव काकतकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री भागानगरे या विद्यार्थिनीला ९ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी शांताई वृद्धाश्रमाची कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी बोलताना सांगितले कि, जुनी वर्तमानपत्रे जमा करून रद्दीतून बुद्धी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रद्दीतून आलेल्या रकमेचा सदुपयोग म्हणून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्यात येत आहे. याच माध्यमातून आज चार विद्यार्थ्यांना आर्थिक सहायय करण्यासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. 
भारतदेश महाविद्यालयाचे संचालक विनोद दोड्डान्नावर बोलताना म्हणाले, समाजात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी अशा सामाजिक संस्थांचा पुढाकार उपयोगी ठरतो. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा विद्यार्थ्यांना विद्या आधार शिक्षण आणि ग्रामविकास सोसायटीची मोलाची मदत मिळते, याबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी विद्या आधार शिक्षण आणि ग्रामविकास सोसायटीचे विनायक लोकूर, संतोष ममदापुर, अलन मोरे, संतोष दरेकर, भरतेश महाविद्यालयाचे कर्मचारी, नीता नाईक, भारती हसलगी, सुरज सुतार आदी उपस्थित होते.


Recent Comments