वर्णकला सांस्कृतिक संघ बेळगावच्या वार्षिकोत्सवानिमित्त बेळगावमध्ये राष्ट्रस्तरीय कला प्रदर्शन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

बेळगावमधील वर्णकला सांस्कृतिक संघ, बेळगावच्या वार्षिकोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक शिल्पकला अकादमीचे अध्यक्ष वीरण्णा अर्कसाली यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. बेळगावमधील वरेरकर नाट्य संघाच्या कला महर्षी के बी कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना विलास अध्यापक म्हणाले, लहान वयातच चित्रकलेचे प्रशिक्षण दिल्यास मोठेपणी या क्षेत्रात अधिक चांगले काम करता येते. या संस्थेने असे कार्यक्रम आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे, यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणित होतो, असे ते म्हणाले. 
अनेक कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक कलाप्रेमींनी घेतला.
यावेळी वर्णकाळा सांस्कृतिक संघाचे नागेश यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, दरवर्षी आपण या कार्यक्रमाचे आयोजन करतो. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कर्नाटकातील ५ सुप्रसिद्ध कलाकारांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असून के बी कुलकर्णी, आर आय सावंत., एस बी सुतार, बी के हुबळी अशा ज्येष्ठ कलाकारांच्या नवे सन्मानित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 
या कार्यक्रमास डॉ. एच बी कोलकार, ज्येष्ठ कलाकार आणि वर्णशिल्पी के वेंकटप्पा, पुरस्कार प्राप्त कलाकार एम आर बालिकाई, युवा नेते राहुल जारकीहोळी, प्रमुख अतिथी रमेश चव्हाण, रजंत हुबळी, दिलीपकुमार काळे, आर ए देवऋषी, नागेश चिमारोल, संतोष मल्लोळ्ळी आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments