फुटबॉल खेळ हा प्रत्येकाला जमेलच असे नाही. यासाठी चौफेर नजरेची आवश्यकता असते. मात्र दृष्टिहीन खेळाडूंनी हा खेळ खेळणे म्हणजे नवलच आहे. बेळगावमध्ये अशाच पद्धतीची फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आणि या स्पर्धेत प्रत्येकाच्या नजरेला खिळवून ठेवणारा खेळ अंध फुटबॉलपटूनि खेळला आहे.

फुटबॉल क्रीडाप्रकारासाठी दृष्टी असणे हे महत्वाचे आहे. फुटबॉल खेळात गोल करण्यासाठी फुटबॉलवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते. मात्र बेळगावमध्ये अंध फुटबॉल टूर्नामेंट मध्ये चक्क अंध फुटबॉल पटूनि खेळाचा सामना रंगवत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आपणदेखील हा खेळ उत्तमप्रकारे खेळू शकतो हे या अंध फुटबॉलपटूनि दाखवून दिले आहे. 
टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या मैदानात तमोप्न ब्लाइंड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने २०२२ सालच्या ब्लाइंड फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ आणि १४ मे असे दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी अंतिम सामना झाला. या सामन्यात बेंगळुरू आणि बेळगाव मधील संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यात बेंगळुरू मधील संघाने बाजी मारली.
आवाजाच्या दिशेने फुटबॉल चा अंदाज घेऊन खेळ रंगवणाऱ्या या अंध फुटबॉल पटूंनी बेळगाव आणि कर्नाटकासह देश विदेशातही आपली कामगिरी दाखवत कौतुक मिळविले आहे. यासंदर्भात प्रशिक्षक सुमित मोटेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, माहेश्वरी शाळेत आपले दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून बुद्धिबळ, स्विमिंगचेही आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचपद्धतीने आपल्याला फुटबॉल चेही प्रशिक्षण देण्यात आले असून कर्नाटाकात सध्या १५ खेळाळू असल्याचे ते म्हणाले. बेळगावसह अरुणाचल, मेघालय येथील क्रीडापटू देखील आपल्यासमवेत असल्याचे त्यांनी सांगितले. 
तसेच प्रशिक्षक रेश्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, कर्नाटकात अंध महिला क्रीडापटूंचा एक संघ आहे. आपल्याला आता एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून पालकांनीही अंध मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन रेश्मा यांनी केले.
अरुणाचल प्रदेशमधील बेंगळूर संघात खेळणाऱ्या डॉमनिक या खेळाडूने सांगितले फुटबॉल खेळात आपण पारंगत झाल्यानंतर बॅडमिंटन देखील खेळण्यास सुरुवात करणार आहे. याचप्रमाणे स्केटिंगमध्येही प्रशिक्षण घेणार असून आपले सर्व शिक्षण बेंगळुरू मध्ये झाले आहे. त्यामुळे पुढील काळात जर अरुणाचल प्रदेशाविरोधात खेळायचे झाल्यास आपण कर्नाटकाच्या बाजूनेच खेळ खेळू असे या खेळाडूने सांगितले.
बेळगाव ब्लाइंड असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी बोलताना म्हणाले, आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी मिळविलेल्या यशाबद्दल आपल्याला आनंद होत आहे. फुटबॉल प्रमाणे क्रिकेट, बुद्धिबळ आणि यासह प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. ()
बेळगावमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या अंध क्रीडापटुंनी देशपातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कामगिरी दाखवून नाव कमवावे, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.


Recent Comments