Belagavi

सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टतर्फे २ हजार स्कूल कीट्सचे वाटप

Share

सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टच्या नव्या कार्यालयाचा उदघाटन समारंभ बेळगावात पार पडला. यानिमित्त शालेय विध्यार्थ्यांना हजार स्कुल कीट्सचे वाटप करण्यात आले.

: होय, बेळगावात सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टच्या नव्या कचेरीच्या उदघाटन समारंभानिमित्त २ हजार स्कुल कीट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी मोफत ऑनलाईन सेवा केंद्राचेही उदघाटन करण्यात आले. यावेळी मुक्ती मठाचे स्वामीजी, फादर रॉबर्ट, हाफिज महंमद इम्रान, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू सेठ, डीसीपी रवींद्र गडादी, अभिजित सिंग आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अकिब बेपारी यांनी संस्थेतर्फे आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासांच्या कल्याणासाठी तसेच समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

 

 

Tags: