Belagavi

चन्नम्मा नगरात श्री लक्ष्मी देवी मंदिराचा बारावा वर्धापन दिन

Share

बेळगावातील चन्नम्मा नगरातील श्री लक्ष्मीदेवी मंदिराचा बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

होय, चन्नम्मा नगरातील लक्ष्मीदेवी या परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत आहे. बुधवारी लक्ष्मीदेवी मंदिराच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी विशेष पूजा, अभिषेक, ओटी भरणे आणि देवीची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली. मंदिरात शेकडो भाविकांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीला फुले व चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यात आले होते.

वर्धापनदिनानिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. चन्नम्मा नगरमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मंदिर समितीच्या राधिका मिर्जी यांनी सांगितले की, महालक्ष्मी देवीचे मंदिर बांधून १२ वर्षे झाली आहेत. देवी लक्ष्मी ही एक चैतन्यशील जागृत देवी असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते असा विश्वास आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीने परिश्रम घेतले. चन्नम्मा नगरसह परिसरातील अनेक भाविक यावेळी उपस्थित होते.

 

Tags: