Belagavi

बसवतत्व प्रसारासाठी लिंगायत धर्म विजयी होणे गरजेचे ,,श्री निजगुणप्रभुंची प्रतिक्रिया

Share

कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी या सर्व भाषणाआधी कोलूवे या भाषेचा जन्म झाला. जगात दोनच भाषा आहेत असे संत बसवेश्वर महाराजांनी सांगितले होते, असे प्रतिपादन तोंटदार्य शाखा मठाचे परमपूज्य निजगुणप्रभू महास्वामी यांनी केले.

जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेना बेळगाव जिल्हा घटक यांच्यावतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटकात लिंगायत समाजाने अशा पद्धतीने, मोठ्या प्रमाणात बसवेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला मी प्रथमच पाहिला असल्याचे ते म्हणाले. तसेच लिंगायत धर्म कशापद्धतीने जिंकेल यासाठी विचार करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. ()

निजगुणप्रभू पुढे म्हणाले, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची कमतरता नाही परंतु धर्मासंदर्भात खूप कमी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धर्मगुरूंमुळे जीवनातील तत्वे विकसित होतात. कर्नाटकात बिदर आणि बेळगावमधील नागनूर मठात बसव तत्वांचा प्रसार केला जातो मात्र इतर ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

प्रवचन कार्यक्रमानंतर बेळगावमधील उमदेव निजगुनी संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी वचन नृत्य कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामी यांनी केले. यावेळी कारंजीमठाचे शिवयोगी देव, ओम गुरुजी, कमत्यानट्टी गुरुदेव स्वामीजी आणि जागतिक लिंगायत महासभा तसेच राष्ट्रीय बसव सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: