Vijayapura

२० हजारांची बेट बेतली जीवावर!

Share

व्यसन माणसाला कोणत्याही स्तराला घेऊन जाऊ शकते याचेच एक ताजे उदाहरण विजापूरमध्ये पाहायला मिळाले आहे. आपल्या मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या एका व्यक्तीने तलावात पोहण्याची बेट लावत आपले प्राण गमावले असल्याची घटना विजापुरात घडली आहे.

मद्यपान करून नशेत असणाऱ्या व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना विजापूरमध्ये घडली आहे. विजापूरमधील द्यायबेरी या गावातील प्रकाश मोरे असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. विजापूरमधील प्रकाश ढाबा येथे काम करणाऱ्या प्रकाश मोरे या इसमाने सोमवारी आपल्या मित्रांसमवेत दुपारी पार्टीचा बेत केला आणि हाच बेत त्याच्या जीवाशी आला. पार्टीमध्ये मद्यप्राशन करून २० हजारांची बेट लावत पोहण्यासाठी गेलेल्या प्रकाश मोरेचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. प्रकाश मोरे तलावात बुडत असल्याने त्याच्या मित्रांनी सदर ठिकाणाहून पळ काढला असून तातडीने याठिकाणी अग्निशामक दल, पोलीस विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकाश मोरेचा मृतदेह बाहेर काढला आहे.

प्रकाश आपल्यासमवेत ढाब्यात काम करत होता. तर प्रकाशची पत्नी शेतात मोलमजुरी करण्यासाठी जाते. तसेच आपल्या मालकीच्या काही जमिनीत देखील काम करून आयुष्य सुरु होते. काल दुपारी प्रकाश मोरे याने १५ हजार रुपये रक्कम घेऊन गेल्याने बेट लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रकाश समवेत असलेले त्याचे मित्र फरारी असून प्रकाशचा खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

मयत प्रकाश मोरे याच्या पश्चात दोन लहान मुले आणि दोन लहान मुली अशी एकूण चार अपत्ये आहेत. आपल्या वडिलांचा मृतदेह अशा अवस्थेत पाहून पत्नीसह चारही मुलांनी एकाच आक्रोश केल्याने हा सारा प्रकार हृदय पिळवटून टाकणारा होता. व्यसनाच्या सवयीतून मद्यप्राशन आणि यादरम्यान झालेल्या पार्टीत बेट लावण्यात आल्याचा तर्क व्यक्त होत असून या बेतातील बेटामुळे एकाला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

आपली मराठीसाठी विजयकुमार सारवाड इन न्यूज नेटवर्क, विजापूर

Tags: