Vijayapura

तिकोटा येथे दोन कुटुंबांची एकमेकांवर दगडफेक; ६ जखमी 

Share

 पूर्व वैमनस्यातून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथील शांतीनगर एससी कॉलनीत घडली. या घटनेत जण जखमी झाले आहेत.

तिकोटा शहरातील शांतीनगर एससी कॉलनीत राहणाऱ्या यमनप्पा मलकन्नावर आणि अर्जुन मलकन्नावर या २ भावांत काही कारणावरून पूर्वीपासून वैमनस्य आहे. त्यातूनच आज दोन्ही कुटुंबात भांडण लागून त्याचे पर्यवसान एकमेकांवर दगडफेकीत झाले. या घटनेत ६ हुन अधिकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विजापूर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी तिकोटा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

 

Tags: