Vijayapura

अजानच्या भोंग्यांविरोधात विजापुरात आंदोलन

Share

अजानच्या भोंग्यांविरोधात विजापुरात आज आंदोलन छेडण्यात आले. शहरातील जमखंडी रस्त्यावर सकाळीसकाळीच भक्तिगीते तसेच स्वयंचलित वाद्ये वाजवून अजानच्या भोंग्यांविरोधात आंदोलन करण्यात आले.

विजापुरातील मर्डी बसवेश्वर देवस्थानात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी सकाळी अजानच्या भोंग्यांविरोधात आंदोलन छेडले. भीमू मुनशाळ, शशी गंगनहळ्ळी, इरप्पा हत्ती तसेच अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अजानसाठी वापरले जाणारे भोंगे उतरविण्याची मागणी केली. हे भोंगे उतरवेपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Tags: