बेळगावमध्ये बहुजन समाजाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी आचरणात आणण्यात आली. शुक्रावारी बेळगावमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थित असलेले प्रा. के डी मंत्रेशी बोलताना म्हणाले, बहुजन समाजाच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी आचरणांत आणण्यात येत आहे. अनेक संस्थानांसाठी छत्रपती शाहू महाराज हे आदर्शवादी आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक समस्यांवर त्यांनी मात करत शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे योगदान हे विसरता येणे शक्य नसल्याचे मंत्रेशी म्हणाले. 
यावेळी प्रा. के डी मंत्रेशी, मल्लेश कुरंगी, सुधीर चौगुले, अर्जुन देमट्टी, यल्लाप्पा कोलकार, एम आर कलपत्री, जीवन कुरणे, प्रसाद कांबळे, चेतन होटगी आदी उपस्थित होते.


Recent Comments