पर्यटन ठिकाणी भेट देऊन राज्यातील पर्यटन विकास साधण्याच्या उद्देशाने बेळगावमधील तीन दांपत्ये लडाख ला रवाना झाली आहेत.

राज्यातील पर्यटन विकासासाठी,तसेच पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या उद्देशाने बेळगावमधील तीन दांपत्ये लडाख दौऱ्यावर रवाना झाली आहेत. 
पर्यटनाची आवड नसणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात. अनेकांना दूरचा प्रवास शक्य नसला तरी फेरफटका मारायला तरी नक्कीच आवडतो. एखादा विशिष्ट उद्देश बाळगून पर्यटन करणे हाही एक महत्त्वाचाच विषय आहे. बेळगावमधील तीन दांपत्ये अशाच महत्वाच्या उद्देशाने १ मे रोजी लडाखला रवाना झाली आहेत. शिवशंकर कडबडी, विजयालक्ष्मी कडबडी, राहुल मंगनावर, स्नेहल मंगनावर आणि उत्तम गुर्जर – लता गुर्जर, अशी हि तीन दांपत्ये लडाख च्या प्रवासासाठी निघाली आहेत.
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना उत्तम गुर्जर यांनी सांगितले कि, आपल्या देशात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. निसर्गाने नटलेली सौंदर्यस्थळे आहेत. आपण एकदा तरी आपल्या आयुष्यात या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे, असे गुर्जर म्हणाले.
लडाख दौऱ्यावर पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने निघालेल्या या तिन्ही दाम्पत्यांना बेळगावकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments