Vijayapura

पीएसआय नेमणूक प्रकरणी भाजप, काँग्रेस सह जेडीएसचा हात ;आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा आरोप

Share

पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचा हात असल्याचा आरोप विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यांनी केलाय. या प्रकरणी सत्यासत्यता पडताळून पहावी, असा आग्रह देखील बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलाय.

विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले, पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप, काँग्रेस, जेडीएस पक्षातील नेत्यांचा सहभाग आहे. केवळ राजकारणीच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हि बाब मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनात आली नाही का? हे एक अवैध जाळे आहे याची कसून चौकशी करावी, असा आग्रह त्यांनी केला. परीक्षांमध्ये अधिक पारदर्शक व्यवस्था आणण्यासाठी कायदा तयार करण्याची आवश्यकता असल्याचेहि यत्नाळ म्हणाले.

पीएसआय नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी सीबीआय किंवा सीआयडीकडे प्रकरण सोपविण्यात यावे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने निर्णय घ्यावा, आपलेच सरकार असूनही मी सरकारचे समर्थन करत नाही. शिवाय या प्रकरणात केवळ भाजपचं नाही तर इतर पक्षदेखील सहभागी आहेत. . या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी, कर्नाटकात अनेक उत्तम आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास पुढे सुरु ठेवावा असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यात सुरु असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्याप्रकणी योग्य तपास व्हावा, योग्य चौकशी व्हावी असा आग्रह आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलाय. आता सरकार याप्रकरणी कोणते पाऊल उचलणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Tags: