ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात तपास सुरु केला आहे. हिंडलगा ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे.

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी हिंडलगा ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट देऊन चौकशी केली होती.
त्यात नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. ही जीपीए का घेतली? त्यासाठी संतोष पाटील याना किती पैसे दिले होते आदी प्रश्न विचारून उडुपी पोलिसांनी तपास चालविला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल जप्त केला आहे.




Recent Comments