Vijayapura

स्टोअरकिपर असलेल्या गोविंद कारजोळना मी संधी दिली : रमेश जिगजीनगी

Share

स्टोअर किपर म्हणून काम करत असणाऱ्या गोविंद कारजोळ यांना राजकारणात मोठे करण्यासाठी आपण कारणीभूत असून आपल्या आमदारकीनंतर गोविंद कारजोळ यांना त्रास झाला का? असा सवाल खासदार रमेश जिगजीनगी यांनी उपस्थित केला.

गोविंद कारजोळ यांना राजकारणात मोठे करण्यासाठी आपण राजकारणात लक्ष घातले नाही. त्यांना मोठं करण्यासाठी आपण राजकारणाचा त्याग केला. स्टोअर किपर कामाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठीशी कोण उभे होते? राजकारणात गोविंद कारजोळ नाव कमावतील असा विचारही कुणी केला नव्हता. मुधोळ मतदार संघाचाही आपण त्याग करून त्याठिकाणी गोविंद कारजोळ यांना उमेदवारी मिळवून दिली. रेड्डी गौडा यांनी आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी अट्टाहास केला.१९९८ मध्ये राजकारण सोडल्यानंतर पुन्हा विधानसौध पहिली नाही. विधानपरिषद पहिली नाही. संपर्कच बंद केला. कारजोळांसाठी आपण त्याग केला. मात्र माझ्या आमदार होण्याने गोविंद कारजोळ यांना त्रास झाला. आता आपणदेखील राजकारणात प्रवेश घेण्यासंदर्भातदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी गुंता ना वाढविण्याची विनंतीही त्यांनी केली. ()

Tags: