Belagavi

डॉ. राजकुमार कन्नड संस्कृतीचे राजदूत : अशोक दुडगुंटी

Share

निष्कलंक व्यक्तिमत्व, तल्लख अभिनय, कर्तव्याची जाणीव आणि साधे, अप्रतिम पात्र रंगविणारे डॉ. राजकुमार हे कन्नड संस्कृतीचे राजदूत आहेत, अशी प्रतिक्रिया अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन, माहिती आणि जनसपंर्क विभागाच्या वतीने तिवारी डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. राजकुमार यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उद्देशून अशोक दुडगुंटी बोलत होते.

यावेळी बोलताना अशोक दुडगुंटी म्हणाले, डॉ. राजकुमार यांच्या चित्रपटात सामाजिक संदेश होता. त्यांच्या चित्रपटांनी प्रेरित होऊन अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. डॉ. राजकुमार हे कन्नड संस्कृतीचे राजदूत आहेत. कन्नड भाषेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी त्यांचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले. डॉ राजकुमार यांची राज्यात मोठी लोकप्रियता होती आणि आजतागायत टी तशीच टिकून असल्याचे अशोक दुडगुंटी म्हणाले.

यानंतर राजशेखर तळवार बोलताना म्हणाले, डॉ. राजकुमार हे एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचा पुतळा बेळगाव महानगर पालिकेत स्थापन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पत्रकार पुरुषोत्तम यांनीही डॉ. राजकुमार यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास श्रीशैल मठद, इमामहुसेन गुडुनवर, शिवराय एळुकोटी, संपत कुमार, मुचळंबी, सुभानी मुल्ला, राजशेखर हिरेमठ, सुरेश नेरली, छायाचित्रकार पी के बडिगेर, मुत्ताप्पा मादर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनंत पप्पू यांनी आभार मानले.

Tags: