फर्निचर वर्कशॉपला आग लागल्याने कोट्यवधी रुपयांची मशिनरी, किंमती लाकूड आगीत भस्मसात झाले आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी स्टेशन येथे हि घटना घडली आहे.
या फर्निचर दुकानात सीएनसी मोटार आणि इतर मशिनरी होत्या. या साहित्याची किंमत जवळपास कोटीच्या घरात होती. या आगीत फर्निचर दुकानातील सागवानी लाकूड देखील भस्मसात झाले असून शांताप्पा बडिगेर , बसवराज बडिगेर , संगु बडिगेर , मल्लिकार्जुन बडिगेर आणि संतोष बडिगेर यांच्या मालकीची हि दुकाने आहेत.
पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंडी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.



Recent Comments