Belagavi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यात दहा ठिकाणी स्मारक उभे करण्यात यावे, यासह वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावे यासाठी सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य डॉ. बी आर आंबेडकर स्मारक आणि वस्तुसंग्रहालय तसेच संशोधन केंद्र निर्माण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील दहा गावांमध्ये स्मारक उभे करावे, याचप्रमाणे वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सरकारने आदेश जारी करावा, अशी मागणी निर्माण समितीच्या शिष्टमंडळाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केली आहे. अर्थसंकल्पात यापूर्वीच १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यासंदर्भात तातडीने आदेश देऊन या सर्व गावातील कामे मार्गी लावावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे.  यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना समितीचे राज्य उपाध्यक्ष मल्लेश चौगुले म्हणाले, कर्नाटकात ज्या ज्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आहे अशा १० ठिकाणी डॉ बी आर आंबेडकर स्मारक उभारण्यात यावे, यासह वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्राचीही स्थापना करण्यात यावी, यासाठी सरकार दरबारी निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आश्वासन देऊन अर्थसंकल्पात तरतूद देखील केली आहे. सदर १० गावांमध्ये १० एकर जागा तसेच १० कोटी रुपयांचे अनुदान देऊन सरकारतर्फे हे सर्व कामकाज करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती मल्लेश चौगुले यांनी दिली.

यावेळी राज्य उपाध्यक्ष मल्लेश वचगुले, अर्जुन देमट्टी, महादेव तळवार, आनंद कोलकार, आर एम सिंगे, अनिल कांबळे, बी ती मेत्री, जीवनकुमार कुरणे आदी उपस्थित होते.

Tags: