Belagavi

सचिन हॉस्पिटलच्या शिबिराला चांगला प्रतिसाद

Share

महाराष्ट्रातील मिरजेतील सचिन हॉस्पिटलतर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या मोफत स्त्री रोग आणि वंध्यत्व निवारण उपचार शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रातील मिरजेतील प्रियदर्शिनी हॉटेलजवळील सचिन हॉस्पिटलतर्फे मोफत स्त्री रोग आणि वंध्यत्व निवारण उपचार शिबिर नुकतेच आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. डॉ. सचिन सुगणावर यांनी या शिबिराचे दीप प्रज्वलनाने उदघाटन केले. हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या वाटचालीचीही माहिती त्यांनी दिली. या शिबिरात मूल न होणाऱ्या दाम्पत्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला व उपचार मोफत देण्यात आले. महिलांमधील आजार, वंध्यत्वाची कारणे आदींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सचिन सुगणावर यांनी रुग्णांची तपासणी केली.

 

Tags: