Belagavi

राज्यातील एपीएमसी बंद करणार नाही : सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर

Share

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. या समित्यांमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होत आहे असे सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी सांगितले

बेळगावात बुधवारी राज्य सौहार्द सहकार संस्थेच्या बेळगाव विभागीय कार्यालयाचे उदघाटन सहकार मंत्री सोमशेखर यांच्याहस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यातील एपीएमसी बंद करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर सोमशेखर म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. या समित्यांमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय, त्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे त्या बंद करण्याचा प्रश्नच उदभवत नाही  असे त्यांनी सांगितले.

एकीकडे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार असल्याच्या अंदाजाने शेतकरी संघटनांनी राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. मात्र सरकार त्या बंद करणार नसल्याचे स्पष्टीकरण सहकार मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आपले आंदोलन मागे घेतील अशी अपेक्षा आहे.

 

Tags: