Belagavi

सहकार क्षेत्र फोफावत आहे : सहकार मंत्री एस टी सोमशेखर

Share

राज्यात सहकार क्षेत्र आता फोफावत चालले असून अलीकडच्या काळात सहकारी संस्था स्वतःच्या इमारतीत स्वतंत्र कारभार करत आहेत, अशी प्रतीपादान सहकार मंत्री एस टी सोमशेखर यांनी केले.

बेळगाव शहरात राज्य सौहार्द सहकारी संगःच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एस टी सोमशेखर म्हणाले, कर्नाटक राज्य सौहार्द सहकार विभाग अलीकडच्या काळात फोफावत चालला आहे. सरकारने सहकार विभागही मुक्त केला असून सुमारे १हजार ठेवीदार आणि ५५ हजार कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत. कृष्णा रेड्डी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्या संघाच्या सहकार्याने स्वतःची इमारत उभी करण्यात आली आहे, हि आनंदाची बाब आहे. आज बेळगावमध्ये सहकारी संघाच्या नूतन इमारतीचे उदघाट्न करण्यात आले असून या कार्यात कृष्णा रेडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत सोमशेखर यांनी व्यक्त केले.

सध्या अनेक सहकारी संस्था अडचणीत येत आहेत याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सोमशेखर यांनी सांगितले कि, अशी अनेक प्रकरणे आपल्या निदर्शनात आली आहेत. या प्रकरणी रिझर्व्ह बँक कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत असून अशा घडामोडींसंदर्भात कायदेशीर कारवाई कशी करता येईल, याचा विचार देखील सुरु आहे. अशा घडामोडींमुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असून या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची कारवाई केली जाईल, अद्यापही सुधारणेसंदर्भात विचार सुरु असल्याची प्रतिक्रिया एस टी सोमशेखर यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यात २० हुन अधिक सहकारी बँका अडचणीत आल्याचे वृत्त आले असून यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सोमशेखर यांनी सांगितले कि, सहकारी बँकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम आम्ही करत असून बँकमध्ये गुंतविलेले रक्कम परतफेड करण्यात येईल, असा विश्वास ग्राहकांना मिळावा, यासाठी सहकार प्रणालीड दुरुस्ती करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. कृष्णा रेड्डी आणि त्यांची टीम यावर काम करत असून सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असेल तर नक्कीच कारवाई होईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली. ()

सहकार क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक बदल जनता सध्या अनुभवत आहे. बेळगावमध्ये सहकार संगःचे स्वतःचे असे स्वतंत्र कार्यालय आता स्थापन झाले असून सहकार क्षेत्राविषयो जनतेमध्ये निर्माण झालेली शंका आणि सहकार क्षेत्रासंदर्भात जनतेची असलेली धारणा या माध्यमातून नक्कीच दूर होईल, अशी आशा आहे.

Tags: