Vijayapura

विजापूर पत्रकार संघाचा अधिकारग्रहण

Share

 विजापूर जिल्हा कार्यकारी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. मावळते जिल्हाध्यक्ष सचिंद्र लंबू यांनी नवे जिल्हाध्यक्ष संगमेष चुरिगे यांना अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द केली.

: शहरातील नव्या पत्रकार भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली. मावळते प्रधान सचिव विनायक सोंडूर, खजिनदार दीपक शिंत्रे, राज्य कार्यकारी समितीचे सदस्य देवेंद्र हेळवर यांनी निवडणूक अधिकारी टी. के. मलगोंड यांच्या उपस्थितीत अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द केली.

यावेळी नूतन पदाधिकारी डी. बी. वडवडगी, इंदुशेखर मणूर, मोहन कुलकर्णी, राहुल अप्पे आदी उपस्थित होते.

Tags: