अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावू नयेत या मागणीसाठी मंगळवारी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे ‘सिटू‘च्या नेतृत्वाखाली निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कामाचे ओझे झाले असूनही ते निवडणुकीची कामे करत आहेत. आयसीडीएस काम करणे त्यांच्या आवाक्यापलीकडचे झाले आहे. याबाबत अनेकदा आंदोलने केल्यावर सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी लावू नये असा आदेश काढला आहे. त्यामुळे आम्हाला बीएलओ काम सोपवू नये अशी मागणी निदर्शक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी सिटूच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर बोलताना अंगणवाडी कार्यकर्त्या संघटनेच्या तालुकाध्यक्षा मंद नेवगी म्हणाल्या, अंगणवाडी कार्यकर्त्याना निवडणुकीचे अतिरिक्त काम देण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी चालविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालत आहेत. त्यामुळे आम्हाला कोणते काम करावे हे समजेनासे झाले आहे. मूळ काम सोडून मतदार यादीचे फॉर्म भरून देणे, ओळखपत्रे देण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून आम्हाला वगळावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी व्ही. सी. चव्हाण, एस. पी. रजपूत, एन. बी. पत्तार, एस. एस. कांबळे, ए. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments