बेळगाव तालुक्यातील चंदनहोसूर गावात १३ दिवसांचा श्री कलमेश्वर आणि ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिभावाने उत्साहात सुरु आहे.

होय, १० ते २२ एप्रिल असा १३ दिवसांचा श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रोत्सव चंदनहोसूर गावात भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त गावात दोन्ही देवतांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील हजारो भक्त दररोज गावाला भेट देऊन श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मीचे दर्शन घेत आहेत. इंगळ्या, आंबील गाड्यांची मिरवणूक, हळब आणि ग्रामस्थांकडून महालक्ष्मी देवीची ओटी भरणे, आडवी पालखी महोत्सव, गावातील महिलांकडून देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम भंडार्याच्या उधळणीत भक्तिभावाने पार पडले. गावच्या यात्रेनिमित्त चंदनहोसूरमध्ये उत्सवी वातावरण आहे. 
उद्या २० एप्रिलला महालक्ष्मी देवी गदगेवरून उठणार आहे. त्यानंतर २१ एप्रिलला देवीचा शयनोत्सव होईल. २२ रोजी देवीची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे. या विधींनी लक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.


Recent Comments