बेळगावमधील राणी पार्वतीदेवी पियू कला आणि वाणिज्य महाविद्यालयात जिमखाना डे चे आयोजन केले होते.

बेळगाव मधील आरपीडी महाविद्यालयात केव्ही गिरी ऑडिटोरियममध्ये जिमखाना डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एएसपी महानंद नंदगावी, डीएसपी सुदर्शन, आरपीडी महाविद्यालयाचे कार्यकारी कमिटीचे उपाध्यक्ष डी बी कलघटगी, चेअरपर्सन लता ए कित्तूर आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमात उपास्थीतांना उद्देशून बोलताना अतिरिक्त एएसपी महानंद नंदगावी म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना विद्येचा दागिना घेऊन बाहेर पडावे, याचा उपयोग भविष्यात नक्कीच होईल. विद्यार्थ्यांनी पालकांवर अवलंबून न राहता आपल्या विद्येचा वापर करून आपल्या गरज पूर्ण करून घ्याव्यात. हल्ली मोबाईलमुळे अनेक गुन्हांमध्ये वाढ होत चालावी असून शिक्षण घेताना विद्यार्थ्यंनी मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील बेस्ट बॉय आणि बेस्ट गर्ल ची निवड करून वृषाली या विद्यार्थिनीला आणि रुद्र प्रभू जितेंद्र या विद्यार्थ्याला इंदुमती सेवंतीलाल शहा पुरस्कार, आर के देसाई शिष्यवृत्ती, १७०० रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के बी मेळेद, शारीरिक संचालक डी बी कुडची, महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments