Belagavi

अतुल शिरोळेने मारले मुचंडीचे मैदान

Share

बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पैलवान अतुल शिरोळे याने मातीच्या कुस्तीत आपला दमदार खेळ दाखवत आपल्याच गावचे मैदान मारले आहे.

मुचंडी गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त मुचंडीत कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते.  या आखाड्यामध्ये अनेक लहान-मोठ्या कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या, प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये त्याच गावचा पैलवान अतुल शिरोळे विरुद्ध कोल्हापूरचा संकेत यांच्यात कुस्ती झाली.  या कुस्तीमध्ये पाचव्या मिनिटाला अतुल शिरोळेने  धोबीपछाड डावावर कोल्हापूरच्या संकेत पैलवान याला चितपट करत मुचंडीचे मैदान मारत उपस्थितांच्याकडून वाहवा मिळवली.

देवस्थान पंचकमिटी सदस्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. कुस्ती जिंकल्यानंतर रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. अतुल शिरोळे याने या अगोदर मॅटवरच्या कुस्त्या खेळून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्त्या जिंकल्या आहेत.

 

Tags: