दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढण्यात येणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण जगन्नाथ रथयात्रा आज रविवारी बेळगावात मोठ्या भक्तिभावात पार पडली.

होय, हरीबोल गजरात निघालेल्या रथयात्रेत हजारो कृष्णभक्तानी सहभाग घेतला. त्याचबरोबर श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्ररथ रथयात्रेचे मोठे आकर्षण ठरला. बॅरिस्टर नाथ पै चौक, शहापूर येथून रथयात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे बेळगाव प्रमुख श्री रसामृत प्रभू स्वामी यांच्या हस्ते श्री जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रा मातेचे पूजन करण्यात आले. सामूहिक आरतीचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते रस्त्याची सफाई करून आणि रथ ओढून रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला. फ्लो
रथयात्रेच्या अग्रस्थानी बैलगाड्या, भगवान श्री कृष्णांच्या जीवनावरील काही देखावे, लेझीम, भजनी मंडळ, भजन, किर्तन करणाऱ्या भक्तांचा समूह आणि रथयात्रेचे समोर प्रभुपाद यांची प्रतिमा असलेली बग्गि यांचा समावेश होता. संपूर्ण मार्गावर इस्कॉनच्या सेवेकरी युवतींनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. वाटेत प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. रथमार्गावर भक्त समूहाकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
बॅरिस्टर नाथ पै चौक येथून सुरू झालेली रथयात्रा पुढे खडेबाजार शहापूरमार्गे, बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेसकडून इस्कॉन मंदिरात पोहोचली. तेथे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली. फ्लो
श्री राधा गोकुळानंद मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मंडपातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. याठिकाणी उपस्थित भक्तांना प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले.


Recent Comments