Vijayapura

विजापूर जिल्ह्यात भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती

Share

विजापूर जिल्ह्यातील विविध मारुती मंदिरात भक्तिपूर्ण वातावरणात श्री हनुमान जयंतीचे आचरण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या.

स्पर्धेच्या युगातही धार्मिक सण, उत्सव सामूहिकपणे साजरे करण्याची परंपरा विजापूर जिल्ह्याने मनस्वी जपली आहे. आज चैत्र मासातील पौर्णिमेनिमित्त सर्वत्र मोठा उल्हास दिसून येत असून या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.. एयाच औचित्याने विजापूरमधील जागृत देवस्थानात आज भक्तांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत हनुमान जयंती साजरी करण्यात आली. आहे.

प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या औचित्याने विजापूरमधील गांधी मार्ग येथील मदला मारुती मंदिरात विशेष पूजा करण्यात आली होती. या मंदिरात शहरातील भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. प्रत्येक वर्षी सकाळपासून सायंकाळपर्यंत या मंदिरात दर्शनासाठी रीघ लागलेली असते. कडक उन्हाच्या तडाख्यात देखील रांगेत उभं राहून भाविक दर्शन घेताना दिसून येत होते. शहरातील अनेक हनुमान मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

विजापूर सह इतर जिल्ह्यात देखील हनुमान मणिदर सुशोभित करण्यात आले होते. गुरुवारी रात्रीपासूनच देवस्थानात तयारीला वेग आला होता. प्रत्येक देवस्थानाच्या समोर मंडप देखील उभारण्यात आला होता. सकाळी अभिषेक, दुपारी अलंकार पूजा यासह विविध विधी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या.

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या मदला मारुती या पुरातन मंदिरात मोठ्या श्रद्धेने भाविकांनी सहभाग घेतला. आदर्श नगर येथील हनुमंत मंदिर, विवेक मग येथील प्रसन्न पंचमुखी प्राणदेव देवस्थान, प्रसन्नंजनेय देवस्थान, लद्दीकट्टी हनुमंत देवस्थान, पारेख नगर येथील हनुमान मंदिर यासह विविध ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती.

विजापूर परिसरातील भुतनाळ तलाव परिसरातील हनुमान मंदिरात देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच बबळेश्वर हलगणी पुरातन हलगणेश्वर देवस्थान, आदी ठिकाणी विशेष पूजा, धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. विजापूर जिल्ह्यातील यलगुरू अंजनेय देवस्थानाला माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींनी भेट देऊन दर्शन घेतले.

देशभरात अनेक ठिकाणी हनुमान जयंतीचे श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. विजापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात देखील आकर्षक रोषणाईसह विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून, महाप्रसादाचे आयोजन करून हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

Tags: