Vijayapura

कुमारस्वामींनी घेतले यलगुर अंजनेयाचे दर्शन

Share

हनुमान जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री एक. डी. कुमारस्वामी यांनी आज विजापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध यलगुर अंजनेयाचे दर्शन घेतले

‘जनता जलधारा’ कार्यक्रमासाठी आलमट्टी येथे आलेल्या कुमारस्वामी यांनी तत्पूर्वी त्यांनी यलगुर अंजनेयाचे दर्शन घेऊन जनता जलधारा कार्यक्रम निर्विगणपणे पार पडू दे अशी प्रार्थना केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, आज राज्यभरात हनुमान जयंती श्रद्धा-भक्तीने साजरी करण्यात येत आहे. आजचा दिवस पवित्र आहे. कोणत्याही कार्यासाठी हनुमंताचा आशीर्वाद घेतला की त्यात यश हमखास मिळते अशी श्रद्धा आहे. आजपासून जनता जलधारा कार्यक्रम सुरु करत आहे. देव हनुमान जेडीएसला सर्व शक्ती देऊन आशीर्वाद देवो हा या मागचा हेतू आहे.

राज्यातील नद्यांचे पाणी जनतेलाच मिळाले पाहिजे असा संकल्प या निमित्त करतो आहोत. प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे हा उद्देश आहे. आगामी ५ वर्षांत राज्यातील सर्व पाणी योजना पूर्ण करून राज्य हरित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हनुमान जयंतीदिनी हा लढा सुरु करण्याचे कारण म्हणजे, हनुमानाने सर्व शक्ती पक्षाला द्यावी हा हेतू आहे असे कुमारस्वामी म्हणाले.

 

Tags: