बेळगाव शहरात जागतिक कला दिनानिमित्ताने गुलमोहोर बाग चित्रकला संघटारगे अद्भुत पेंटिंग, चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिळकवाडी येथील काल महर्षी के बी कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ५ दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून १५ एप्रिल रोजी सुभाष देसाई, श्रीमती स्वाती जोग, मंगेश पाटील यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. १६ एप्रिल पासून होणाऱ्या चित्रकला प्रदर्शनात गुलमोहोर बाग चित्रकला संघातील ३७ कलाकारांच्या सर्व कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना अंजली पवार म्हणाल्या, बेळगाव शहरात गुलमोहोर बाग कला संघाच्या वतीने चित्रकला, पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून आपण चित्रकलेसाठी ३० वर्षांपासून के बी कुलकर्णी यांच्याकडून प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

याचप्रमाणे शिल्पा खड्कभावी यांनी माहिती देताना सांगितले, जागतिक कला दिनाच्या निमित्ताने पेंडेटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ प्रत्येक कलाकाराने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रीती पावटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, जागतिक कला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या पेंटिंग प्रदर्शनात गुलमोहोर बाग संघाच्या वतीने विविध पेंटिंग प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

५ दिवस भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात आकर्षक आणि मनमोहक पेंटिंग्स पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ प्रत्येक कलाप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन गुलमोहोर बाग कला संघातर्फे करण्यात आले आहे.


Recent Comments