Belagavi

बेळगावमध्ये लवकरच राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धा-सतीश जारकीहोळी

Share

बेळगावमध्ये राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती केपीसीसी कार्यध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अमेच्युर कब्बड्डी असोसिएशन आणि सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धांचा समारोप झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून गोकाकमध्ये फ़ुटबाँल, व्हॉलीबॉल, स्पर्धा घेण्यात येत आहे. बेळगावमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक असून राहुल जारकीहोळी यांची अमेच्युर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली असून आपल्यासाठी हि आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. बेळगावमध्येही राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धांचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मोफत जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. ३५०० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी, प्रथम पारितोषिक ३००००, दुसरे पारितोषिक २००००, आणि तिसरे पारितोषिक १०००० असे या स्पर्धेचे आणि बक्षिसाचे स्वरूप होते.

या स्पर्धेत महिला विभागात चिंचली येथील जय महाकाली संघाने प्रथम पारितोषिक पटकाविला. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजय वॉरियर्स, तृतीय क्रमांक बेळगाव बालिका स्पोर्ट्स संघ तसेच बिरडी येथील अभाजी फाउंडेशन संघाने पटकाविला.

बेस्ट रायडर म्हणून अथणी येथील अश्विनी कोटी, बेस्ट कॅचर बिरडी येथील अंजली मैशाले, ऑल राउंडर म्हणून चिंचली येथील दीप मैशाले, तसेच बेस्ट संघ म्हणून संकनहट्टी येथील एस व्ही इ एस संघाला सन्मानित करण्यात आले.

पुरुष विभागात नांगनूर येथील महालक्ष्मी संघाने प्रथम, गळतगे येथील वानर संघाने दुसरा तर चिंचली येथील जय महाकाली संघ आणि रायबाग येथील ज्युनियर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. पुरुष संघात बेस्ट पोझर म्हणून वानरसेना संघाचे सुशांत, बेस्ट पोझर म्हणून ज्युनियर संघाचे देसाई, ऑल राउंडर म्हणून महालक्ष्मी संघाचे विठ्ठल आणि बेस्ट संघ म्हणून बसवेश्वर संघाची निवड करून गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार शाम घाटगे, रमेश कुडची, काँग्रेस नेते महावीर मोहिते, महेश तम्मण्णावर, पंचनगौडा द्यामन्नावर, बेळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाचे बेळगाव विभागाचे उपसंचालक बसवराज मिल्लनट्टी, जिल्हा अमेच्युर कब्बड्डी असोसिएशन बेळगाव संस्थापक सचिव बाळेश बरगाली, बागलकोट जिल्हा अमेच्युर कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: